पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले, 85 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी, गांधीवादी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. विधिमंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून त्यांच्या वेगळ्या कार्याने ओळख तयार झाली होती. त्यांच्या निधनानंतर समाजवादी विचारवंत, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल, दरम्यान अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय विलास किरोते यांनी दिली. सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरुडमधील गांधी भवन या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी देखील माहिती संबंधितांनी दिली. दरम्यान, आमदार रोहित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर पुरोगामी नेत्यांनी कुमार सप्तर्षी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. समाजात आज जिथे हिंसाचार, जातीभेद , धर्मभेद फोफावला असताना द्वेष, हिंसा, आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही मानवतेची, समाजाची मोठी हानी आहे. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावरील संघर्ष त्यांच्या माध्यमातून गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, कुमार सप्तर्षी हे विद्यार्थी दशेपासूनच चळवळीशी जोडले गेले होते. आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात त्यांनी अनेक आंदोलने केली. तर, 9 ऑगस्ट 1977 रोजी चंद्रशेखरजी यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात कुमार सप्तर्षी यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर, जनता पक्षातर्फे 1978 साली ते अहमदनगरमधून आमदार बनले होते. प
